रविवार, २५ सप्टेंबर, २०११

मन प्रकाशले...

काल आयडीयल मध्ये गेलो होतो, अचानक श्री प्रकाश आमटे यांच्या "प्रकाशवाटा" या पुस्तकावर लक्ष गेलं. आपोआपच हात पुस्तकाकडे गेला. आयडीयल मधल्या काकांना पुस्तक बांधून द्यायला सांगीतलं.

स्टेशनला येऊन बोरीवलीला जाणारी गाडी पकडली, पंण आत चढल्या चढल्या लगेच बाधूंन घेतलेलं पुस्तक उघडलं आणि बास. कालपासुन फक्त पुस्तक वाचतोय बाकी सगळी कामं ठेवली...

आता एक दोन प्रकरणचं बाकी आहेत...




मंगळवार, २० सप्टेंबर, २०११

मराठवाडा मुक्ती संग्राम

                                     !!श्री!!

१६ सप्टेंबर १९४८ - मराठवाडा मुक्त झाला, निजामच राज्य संपल. जवळ जवळ सगळा भारत एकसंध झाला, आता फक्त गोवा राहिल होतं.

निजाम हा त्याच्या जनतेवर आतोनात अत्याचार करत होता. हा छळ असह्य होत होता. त्यामुळेच इथल्या तरुनानी अखेर निजामाची सत्ता उलथवण्याची शपथ घेतली. त्यासाठी सैनिक कॅम्प उभारण्यात आले.
पण या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना हत्यारांची गरज भागविण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. यातच नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील स्वा. सैनिक. दत्ताजी उत्तरवार यांची रजाकारांनी हत्या केली. त्यापाठोपाठ गोविंदराव पानसरे यांची हत्या करण्यात आली. यामुळे स्वातंत्र्य सैनिकांचे पित्त खवळले. अन त्यांनी याचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले. यासाठी " ऑपरेशन उमरी बॅंक" निश्चित करण्यात आले.

 मराठवाडा मुक्ती संग्रामात प्राणांची आहूती दीलल्या आणि लढलेल्या बाधवांस शतशः प्रणाम

किरण

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

सद्रक्षणाय खल निग्रहणाय

                                     !!श्री!!
असे असावेत पोलीस -
विश्वास नांगरे पाटील, तुमच्या माझ्या सारख्या तरुणांसाठी एक प्रेरणा स्रोत आहेत, तुमच्या पैकी अनेकानी त्यांच्याबद्दल वचल, लिहील किंवा ऐकल असेल,

असेल नसेल तरी हे विडीओ पहा :)


मराठी विज्ञान परीषद - पत्रिका

                                 !!श्री!!
मराठी विज्ञान परीषद - पत्रिका
विवीध वैज्ञानीक विषयांवरील छान लेख आहेत, 
   म.वि.प. दंर महीन्याला हि पत्रिका प्रकाशित करते,
सप्टेंबर महीन्याची पत्रिका वाचण्यासाठी इथे टिचकी मार.

अ. भा. मराठी विज्ञान संमेलन २०११

                                 !! श्री !!
अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन २०११
तारखा - २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर
स्थळ - टिळक स्मारक मंदीर, पुणे.
सविस्तर माहिती साठी इथे टिचकी मारा.

Thinking allowed - The Sanskrit tradition -3/3

Thinking allowed - The Sanskrit tradition -2/3

Thinking allowed - The Sanskrit tradition -1/3

शनिवार, १७ सप्टेंबर, २०११

एका मागून एक, सगळे ऊपाय फेक.

                       !!श्री!!

का मागून एक, आधी मुंबई, नन्तर दिल्ली, आता आग्रा,
    पुढे काय? कोणास ठाऊक, बहूतेक यमालाच. ह्या अतिरेक्यानी त्याच काम सोप केलय. एका वारीत २०-२५ सहज. आणि ह्या कमाचा मोबदलाही फक्कड, बीर्याणी, कोंबड्या. आयुष्यभर सरकारी पाहूणे, भारतीय करतयत पहूणचार. खरे यमदूतही त्यांची ही सरबरई पाहून वैतागलेत अशी बातमी आहे.

वेनसडे सारखा ऊपाय शोधायला लागल? की आणखी काही?

येथे मुंबईत झालेल्या बहूतेक सर्व स्पोटांची आणि झालेल्या हानीची यादी आहे,

स्पोटात म्रुत्यु पावलेल्या बंधु आणि भगीनींस  श्रध्दांजली!!!




माझा पहीला ब्लॉग

               !!श्री!!
नमस्कार मित्रहो,
मी किरण अजितकुमार दामले, 


काय लिहू कळत नाही, ४ वेळा खाडाखोड केली तरी अजुन काही जमतयस वा़टत नाही.
खूप दीवसानी लीहायला घेतलय. बहुतेक BA च्या पहिल्या वर्षानतर आत्ताच, बघुया प्रयत्न करून

बर वाटतय फार, मराठीत टंकलेखन करायला तर खुपच गम्मत वाटतेय तेही ईंग्रजी कळपटावर अंदाजे एक एक कळ दाबत, बँकस्पेस करत. एंवढा मजकुर लिहायला १ तासच्यावर लागला,

आता जरा जमायला लागलय, बघुया रोज काही खारडता येतय का?